Header Ads Widget

Responsive Advertisement

Pune News : पुण्यात ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात; 4 ठार, 22 जखमी

मराठी कवर नेट न्यूज । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पुण्यातील नवले पुल जवळील स्वामी नारायण मंदिर येथे आज ट्रक आणि खाजगी यात्रा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगळुरू महामार्गावर साताऱ्याच्या दिशेने एक खासगी पॅसेंजर मुंबईच्या दिशेने जात होती. त्याचवेळी साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकने पाठीमागून ट्रॅव्हलला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती कि यामध्ये ट्रॅव्हल आणि ट्रक दोन्हीही पलटी झाले. या अपघातात 22 जण जखमी झाले आहेत, यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्रोत: Twitter

Post a Comment

0 Comments