Header Ads Widget

Responsive Advertisement

६५५ गावांची होतेय कचराकोंडी

८०९ ग्रामपंचायतींपैकी १५४ ग्रामपंचायतींकडेच घंटागाडी 

अलिबाग : जिल्ह्यातील अनेक गावांत सध्या रस्ते मोकळ्या जागा, नदी, नाल्यांत कचरा सडून गेल्याचे चित्र आहे. या गावांत ग्रामपंचायतींकडून कचरा उचलला जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ मिळेल तेथे कचरा टाकत असल्याने यातील बहुतांश गावांची कचरा कोंडी झाली आहे. जिल्ह्यात जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींपैकी १५४ ग्रामपंचायतींकडे घंटागाडी आहे. मात्र ६५५ ग्रामपंचायतींकडे घंटाही नाही आणि गाडीदेखील. त्यामुळे कचरा समस्या गंभीर झाली आहे.
             जिल्ह्यातील मोजक्याच ग्रामपंचायतीत २०७ घंटागाड्यांच्या माध्यमातून तेथील कचरा उचलला जात आहे. त्यामुळे २० लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रामीण भागातील घंटागाड्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. रायगड जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरण वाढत असल्याने नागरिकांची संख्या वाढल्याने नागरी वस्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरीकरण वाढल्याने तेथील उपलब्ध सोयी सुविधांवर त्याचा ताण येत आहे.
६५५ गावांची होतेय कचराकोंडी
८०९ ग्रामपंचायतींपैकी १५४ ग्रामपंचायतींकडेच घंटागाडी

  • ८०९ ग्रामपंचायतींपैकी १५४ ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडीची व्यवस्था आहे. घंटागाडीची व्यवस्था नाही.

  • म्हसळा, पोलादपूर आणि तळा तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे घंटागाडी नसल्याचे पाणी व स्वच्छता विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. २९ ग्रामपंचायतींनी घंटागाडी खरेदीची तरतूद केली आहे. तर, उर्वरित ७८० ग्रामपंचायतींनी खरेदीच तरतूदही नाही.

  • अलिबाग तालुक्यात बॅटरीवर 3 एक घंटागाडी आहे. तर पनवेल आणि सुधागड तालुक्यात प्रत्येकी दोन घंटागाड्या या बॅटरीवर चालणाऱ्या आहेत. २०२ घंटागाड्या या इंधनावर चालवल्या जात आहेत.

By Dipak Pirkad

Post a Comment

0 Comments