पनवेल-उरणमधील २९ गावे क्लॉक टॉवरशिवाय
गावातील कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली आहे
नवीन पनवेल: पनवेल आणि उरण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये घंटागाडी नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गावांमध्ये कचऱ्याचे ढीग झाले असून, कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसत आहे.
पनवेल तालुक्यात एकूण ७१ ग्रामपंचायती आणि उरण तालुक्यात ३४ ग्रामपंचायती आहेत. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींकडे १२ घंटागाडी नाही, तर उरण तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींकडे घंटागाडी नाही. काही ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थिती नसल्याने घंटागाडी घेता येत नाही. परिणामी परिसरात कचरा वाढू लागलेला आहे.
पनवेल तालुक्यात डम्पिंग ग्राउंड नसल्याने कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. कचरा कुठेही आणि कसाही रस्त्यावर, मोकळ्या जागेत फेकला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. शिवाय त्यामुळे मच्छरांचे असून, या गावांची कचारा कोंडी झाली असल्याने व रहिवासी संख्या वाढत प्रमाणदेखील वाढते. गावांमध्ये आहे. उरणची परिस्थिती वेगळी नाही. असल्याने कचऱ्याची समस्यादेखील जागोजागी कचरा साचलेला दिसून येत येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत बिकट होत चालली आहे.
ग्रामपंचायतीकडे घंटागाडी नाही
पनवेल तालुक्यातील भाताण, देवळोली, दिघाटी, गिरवले, केळवणे, खैरवाडी, खानाव, मालडुंगे, मोरबे, नांदगाव, नानोशी, नितळ, शिरवली, उलवे, उमरोली, वाघिवली, वाजे या १७ ग्रामपंचायती, तर उरण तालुक्यातील आवरे, डोंगरी, फुंडे, गोवठने, हनुमान कोळीवाडा, करल, पाणजे, पिरकोन, पुनाडे, रानसई, सारडे, वशेनी ग्रामपंचायतीकडे घडागाडी नाही.
काही गावामध्ये घंटागाडी येत नसल्याने कचरा उचलला जात नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. ग्रामस्थ जाता येता कचरा ओढ्याच्या कडेला किंवा नदीत किंवा मोकळ्या जागेत टाकतात.
0 Comments