Header Ads Widget

Responsive Advertisement

कर्जतमध्ये कचरा पेटतोय....

नागरिकांच्या तक्रारीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी घेतली दखल


कर्जत : कर्जत हे कचरामुक्त शहर ती म्हणून सन्मानित आहे. असे असले तरी शहरात आडबाजूला कचरा साठून दी राहण्याचे प्रकार वारंवार घडत असून . याला नंतर आग लावण्यात येत आहे. २. यामुळे परिसरातील नागरिकांना याचा वे त्रास सहन करावा लागत आहे. काही जागरूक नागरिकांनी सतत घडणारा हा वे प्रकार पुराव्यानीशी दिल्यानंतर नगर ड परिषदेने त्याची दखल घेतली आहे.


शनिवारी मुख्याधिकारी गारवे यांनी क्ष शहरात याची दखल घेत पाहणी केली व स्वच्छता कर्मचारी व अधिकाऱ्यांना त फैलावर घेतले आहे.

सफाई कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने कचरा अनेक दिवस साठून राहतो. नंतर त्या कचऱ्याला आग लावून नष्ट करण्याचे प्रकार शहरात घडतात. डॉ. काळे यांच्या रुग्णालय परिसरात वारंवार असे प्रकार होत असल्याने त्यांनीही अनेकदा नगर परिषदेला या बाबत कळवले आहे."

मुख्याधिकारी गारवे यांनी सतत येणाऱ्या तक्रारी आणि सोशल मीडियावर कचरा साठून राहत असलेले फोटो पाहून शनिवारी शहरात फिरले. त्यावेळी त्यांना अनेक ठिकाणी कचरा आढळून आला. त्यानंतर त्यांनी त्या कचऱ्याबद्दल सफाई कामगार यांना जाब विचारला. मात्र स्थानिक नागरिकांनी केलेला सततच पाठपुरावा यामुळे अखेर कचरा कुठेही साठून राहणार नाही आणि कचरा जाळण्याचे प्रकार घडणार नाहीत. अशी शास्वती मुख्याधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान, स्थानिकांनी थेट आपल्याला संपर्क करावा अशी देखील सूचना केली आहे.

Post a Comment

0 Comments