विमानाने भुवनेश्वरला हलविले, पण वाचू शकले नाहीत प्राण; एएसआयला पकडले
BY Dipak pirkad
भुवनेश्वर: ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नब किशोर दास यांच्यावर रविवारी ओडिशाच्या झारसुगुडा येथील ब्रजराजनगरमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपालकृष्ण दास (एएसआय) याने गोळ्या झाडल्या. मंत्री दास यांना प्रथम जिल्हा रुग्णालयात आणि नंतर विमानाने भुवनेश्वरला हलविण्यात आले. परंतु अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या उपनिरीक्षकास पकडले आहे.
डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. एकच गोळी शरीरात घुसली होती. आरोपी दास बायपोलर डिस्ऑर्डरने ग्रस्त आहे. त्याला सहज राग यायचा आणि त्यासाठी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने माझी शेवटची भेट घेऊन एक वर्ष झाले आहे, असे एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डॉ. चंद्रशेखर त्रिपाठी यांनी पत्रकारांना सांगितले.
0 Comments